मेट्रोचे वायरिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते दापोडीदरम्यान अल्पावधीत हे काम सुरू होणार आहे.

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांवरील इलेक्‍ट्रिक वायरिंगचे काम फ्रान्समधील अलस्टॉम कंपनी करणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनुक्रमे वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते दापोडीदरम्यान अल्पावधीत हे काम सुरू होणार आहे. अलस्टॉम एकूण २८ किलोमीटरचे काम करणार असून, त्यासाठी सुमारे ११६ कोटींच्या निविदा कंपनीने मिळविल्या आहेत.

मेट्रो प्रकल्पात वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते दापोडीदरम्यान येत्या डिसेंबरमध्ये मेट्रोची चाचणी होणार आहे. त्यामुळे याबाबतच्या कामांना वेग आला आहे. अलस्टॉम कंपनी मेट्रोच्या डब्यांवरील इलेक्‍ट्रिक वायरिंगचे काम करणार आहे. मेट्रो प्रकल्पात ३१ किलोमीटरचे सिग्नलिंगचे काम अलस्टॉम कंपनी करणार असून, त्यांना गेल्या महिन्यात सुमारे २२५ कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. पाठोपाठ आता वायरिंगचेही काम कंपनीने मिळविले आहे. येत्या आठ दिवसांत या दोन्ही कामांना सुरवात होईल, असे कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे. कंपनीकडून चार टप्प्यात काम होणार असून, २०२३ पर्यंत ते पूर्ण होईल.

महामेट्रोने अलस्टॉम कंपनीवर विश्वास दाखविला आहे. त्याबद्दल आम्ही मेट्रोचे आभारी आहोत. भारताच्या शहरी भागांतील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- अलन स्फोर, व्यवस्थापकीय संचालक, अलस्टॉम कंपनी

Web Title: Metro wiring start