मेट्रोच्या कामाला मिळणार गती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रोच्या कामाचे डिझाइन, मेट्रो अलाइनमेंट, मेट्रोसाठी लागणारी जमीन आणि स्थानकांसह मेट्रोच्या होणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गुरुवार (ता. १०) पासून नियोजित मेट्रो मार्गावरील प्रत्यक्ष जागेची आखणी करण्याच्या कामाला सुरवात होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

बापट यांनी शनिवारी पीएमआरडीएच्या मेट्रोसह रिंगरोड, टीपी स्कीम, होर्डिंग पॉलिसी आणि अनधिकृत बांधकामांच्या सद्यःस्थितीची माहिती घेतली. या वेळी पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, प्रवीणकुमार देवरे, मिलिंद पाठक, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी उपस्थित होते.

टाटा-सिमेन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी मेट्रोच्या कामकाजाचे सादरीकरण केले. हिंजवडी-शिवाजीनगर कामाचे डिझाइन, मेट्रो अलाइनमेंट, व्यवहार्यता तफावत निधीसाठी आवश्‍यक सरकारी जमीन, मेट्रो सुरक्षा, मेट्रोसाठी लागणारी जागा, स्थानके आणि विकास आराखड्यावर सुरू असलेल्या बदलाबाबत चर्चा करण्यात आली. 

पीएमआरडीच्या क्षेत्रातील दोन हजार ४३३ अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. १९४ बांधकामांवर कारवाई करून अडीच लाख चौरस फूट बांधकाम पाडले आहे. तसेच अनधिकृत बांधकाम नियमित करण्यायोग्य असलेल्या बांधकामधारकांना सूचना दिल्या आहेत.

पीएमआरडीएच्या क्षेत्रात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित रस्ते विकासकामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. पीएमआरडीएकडे ६०० होर्डिंगधारकांनी नोंदणी केली आहे. एप्रिल २०१८ मध्ये होर्डिंगचे जाहिरात दर निश्‍चित केले आहेत. त्यानुसार जाहिरातधारकांना शुल्क भरून परवानगी देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Web Title: Metro Work