#PuneMetro नदीपात्रात मेट्रोचे काम दोन महिने बंद 

Metro work closed for two months
Metro work closed for two months

पुणे - नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे नदीपात्रातील ६३ खांब पाण्यात गेले आहेत. त्यामुळे तेथील मेट्रो मार्गाचे काम सुमारे दोन महिने बंद राहणार आहे. मात्र त्याचा परिणाम मेट्रोच्या ‘प्रायोरिटी रूट’वर होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. पिंपरी-स्वारगेट मार्गावर हॅरिस पुलाजवळ मुळा-मुठा नदीवरून मेट्रो जाणार असल्यामुळे तेथे पाच खांब उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. वनाज- रामवाडी मार्गावर सुमारे सहा किलोमीटरचा मेट्रो मार्ग नदीपात्राशेजारून जाणार आहे. त्यासाठी ५२ खांब नदीपात्रात उभारले आहेत. डेक्कन आणि संभाजी उद्यान येथे स्थानके होणार आहेत. त्यासाठी खांब उभारणीचे काम सुरू आहे. पाऊस कमी झाला आणि नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ऑक्‍टोबरमध्ये हे काम सुरू होऊ शकते, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे यांनी नमूद केले. 

कल्याणीनगरमध्ये वेगात काम 
वनाज- रामवाडी मेट्रो मार्ग आगाखान पॅलेससमोरून नेण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे रामवाडीपर्यंत मेट्रो नेण्याचे नियोजन केले आहे. त्याला विरोध दर्शविण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने त्याच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता कल्याणीनगरमध्ये मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com