अलाइनमेंट निश्‍चितीपर्यंत मेट्रोचे काम नको - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे - नगर रस्त्यावरील मेट्रोची अलाइनमेंट निश्‍चित होत नाही, तोपर्यंत या रस्त्यावरील मेट्रो प्रकल्पाचे काम थांबवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

वनाज- रामवाडी मेट्रो मार्गावर आगाखान पॅलेस ही पुरातन वास्तू (हेरिटेज स्ट्रक्‍चर) असल्याने भारतीय पुरातत्त्व प्राधिकरणाने मेट्रो मार्गाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने मार्गात बदल केला आहे. सुधारित मार्गानुसार मेट्रो आता कल्याणीनगरमार्गे रामवाडीला जाणार आहे. परंतु, या बदलाला परिसरातील रहिवाशांचा विरोध आहे. 

या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘शास्त्रीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ आदी भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे. प्रवासी संख्या लक्षात घेऊन मेट्रो त्या मार्गाने जायला हवी. परंतु, कल्याणीनगरमधून गेल्यास पुरेसे प्रवासी मिळणार नाहीत. तसेच मेट्रोची अलाइनमेंट निश्‍चित करताना त्या परिसरातील नागरिकांशी चर्चा करणे आवश्‍यक आहे. कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये.’

Web Title: Metro Work Vandana Chavan