Metrozip
Metrozip

मेट्रो झिप गाठणार ‘शंभरी’

पिंपरी - खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली खराब स्थिती, वाहतूक कोंडी यातून प्रवास करणे टाळण्यासाठी हिंजवडीतील आयटी कर्मचारी मेट्रो झिप बससेवेला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत बसची संख्या शंभरपर्यंत नेण्यात येणार असल्याचे हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी सांगितले. 

आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मेट्रो झिपकडून ६० बस चालविण्यात येतात. आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे दोन ते तीन हजार कर्मचारी त्याचा लाभ घेत आहेत. त्यात ४० नव्या बसची भर पडणार आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांची संख्याही दोन ते तीन हजारांनी वाढणार आहे. पुणे आणि परिसरातील ४० ते ४५ वेगवेगळ्या मार्गावर या बस सध्या चालविण्यात येत आहेत. 

आयटी पार्कबरोबरच अन्य भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब आहे. त्यामुळे अनेक भागाला वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. तसेच प्रदूषणाची समस्याही मोठी आहे. त्यामुळेच आयटी कर्मचारी या बसचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे भोगल यांनी नमूद केले. 

मेट्रो झिपने प्रवास करणे आरामदायी असले तरी कोंडी आणि अन्य समस्यांमुळे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी सव्वा ते दीड तासापर्यंत खर्च करावा लागतो. प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळेत ही समस्या जाणवते. प्रवासाचा हा वेळ कमी करण्यासाठी पुणे आणि परिसरातील ज्या रस्त्यांवर कायम कोंडी असते त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्‍यकता असल्याचे भोगल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com