खवय्यांसाठी "एमएच- 12 खाऊ गल्ली- सीझन 4' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

एमएच- 12 खाऊ गल्ली- सीजन 4 
ठिकाण : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ 
दिनांक : 25 व 26 फेब्रुवारी 
स्टॉल बुकिंगसाठी, अधिक माहिती व संपर्क : 8308831613, 8308829206, 9130006913, 7507603709 
(संपर्काची वेळ - सकाळी 11 ते 6) 

पुणे - "सकाळ'तर्फे अस्सल पुणेकर खवय्यांसाठी "एमएच- 12 खाऊ गल्ली- सीझन 4'चे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने या व्यवसायात येऊ पाहणारे व नामवंत व्यावसायिक यांचा भरभरून प्रतिसाद या फेस्टिव्हलला मिळत आला आहे. हा फेस्टिव्हल 25 व 26 फेब्रुवारी रोजी राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. 

अनेकांना आपल्या हाताने खाद्यपदार्थ बनवून इतरांना खाऊ घालण्याची हौस किंवा छंद असतो. या छंदाचे अनेक जण व्यवसायात रूपांतर करतात, तर काहींचे व्यवसायाचे स्वप्न हे स्वप्नच राहते. ज्यांना व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांच्यासाठी आणि व्यावसायिकांना जास्तीत जास्त चोखंदळ पुणेकरांपर्यंत आपली पाककला पोचवण्याची संधी "सकाळ'तर्फे दिली जात आहे. आपल्या लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकर खवय्यांना द्यायची असेल, तर लवकरच आपल्या स्टॉलचे बुकिंग करा. या फेस्टिव्हलच्या माध्यमातून तुम्ही पुणेकर खवय्यांपर्यंत सहज पोचू शकता. 

फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे आणि ठिकाणचे खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, राजस्थानी, गुजराथी, महाराष्ट्रीयन स्नॅक्‍स, बर्गर, सॅण्डविच, इंडियन राइस, चायनीज, तंदूर स्पेशल, सी फूड, मालवणी, चाट कॉर्नर, चिकन, फिश, बिर्याणी, स्नॅक्‍स आणि डेसर्टस्‌ किंवा आइस्क्रीम अशा प्रकारांमधील असंख्य खाद्यपदार्थांचा समावेश असेल.

Web Title: MH-12 khau galli season 4