आजपासून खवय्येगिरीचा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

‘एमएच-१२ खाऊ गल्ली- सीझन ४’; शेकडो खाद्यपदार्थ एकाच छताखाली

पुणे - चमचमीत पदार्थांच्या खवय्येगिरीचा दोन दिवसांचा महोत्सव शनिवारपासून (ता. २५) सुरू होतो आहे. ‘एमएच १२ खाऊ गल्ली - सीझन ४’च्या निमित्ताने शेकडो पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

या लज्जतदार यात्रेत एकाच छताखाली भाकरी पिझ्झा, केक, जिलेबी, फासूस रॅप, मिल्क प्रॉडक्‍ट, सिंहगडचं ताक, पुरणपोळी, फापडा, पेस्ट्री, टोर्नाडोज, आइस्क्रीम, बासुंदी, सीझलिंग ब्राऊनी, मोदक, खांडोळी, बिर्याणी, फिश, खिमा पाव, तंदूर, कुल्फी, चिकन, मटण अशा असंख्य खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. 

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक जेमिनी कुकिंग ऑइल, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स प्रा. लि., बिर्याणी पार्टनर लॉग हाउस, इलेक्‍ट्रॉनिक पार्टनर डायनामिक डिस्ट्रिब्युटर्स, बॅंकिग पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., तर रेस्टॉरंट पार्टनर भैरवी प्युअर व्हेज आहेत. या महोत्सवासाठी २५ रुपये शुल्क आहे. हा फेस्टिव्हल राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सकाळी ११ ते ३ आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वांसाठी खुला आहे.
 
‘जेमिनी ऑइल’तर्फे ऑफर
जेमिनी कुकिंग ऑइलतर्फे या महोत्सवात विशेष ऑफर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाच लिटरच्या जारसोबत अर्धा लिटरचे पाऊच मोफत देण्यात येणार असून, इतर पॅकेटवरही सवलत मिळणार आहे.

‘लोकमान्य’तर्फे मेजवानी कूपन
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.तर्फे दर अर्ध्या तासाने कूपन काढण्यात येईल. त्यामध्ये विजेत्या ग्राहकाला मेजवानीची संधी मिळू शकते. यासाठी ‘लोकमान्य’च्या स्टॉलवर कूपन भरून देणे गरजेचे असून, हे कूपन सर्वांसाठी मोफत आहे.

भैरवी प्युअर व्हेजतर्फे भाकरी पिझ्झा
भैरवी प्युअर व्हेजतर्फे या ठिकाणी ज्वारी- बाजरीच्या भाकरीचा पिझ्झा उपलब्ध असेल. याशिवाय चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट आणि मिक्‍स फ्रूटच्या पेस्ट्री ग्राहकांना समोर बनवून दिल्या जाणार आहेत. 

Web Title: mh-12 khau galli season 4 start