एमएच-सीईटीचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी-२०१९’चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांसाठी एमएच-सीईटी २ ते १३ मे २०१९ दरम्यान होणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच एमएच-सीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

एमबीए, एमसीए, विधी अभ्यासक्रम (तीन आणि पाच वर्षे), बी.ई, बी. टेक, बी.फार्म, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी (पदवी आणि पदव्युत्तर), आर्किटेक्‍चर, बीपीएड, एमपीएड, बीएड, एमएड, बीए आणि बीएसस्सी इंटिग्रेटेड कोर्स अशा सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे.

परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सीईटी-सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.

Web Title: MH-CET Exam Time table Declare