म्हाडाची घरे साडेनऊ लाखांपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

पुणे - म्हाडाकडून लॉटरी पद्धतीने सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) साडेनऊ लाखांत, कमी उत्पन्न गटासाठी (लो इन्कम ग्रुप) १४ लाखांत, मध्यमवर्गीयांसाठी (एमआयजी) २६ लाखांत ही घरे उपलब्ध होणार असून, त्यामध्ये सर्वाधिक सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

पुणे - म्हाडाकडून लॉटरी पद्धतीने सदनिका उपलब्ध होणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) साडेनऊ लाखांत, कमी उत्पन्न गटासाठी (लो इन्कम ग्रुप) १४ लाखांत, मध्यमवर्गीयांसाठी (एमआयजी) २६ लाखांत ही घरे उपलब्ध होणार असून, त्यामध्ये सर्वाधिक सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

म्हाडाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड येथील ३ हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी नागरिकांना येत्या शनिवारपासून (ता. १९) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. घरांची सोडत ३० जून २०१८ रोजी होणार आहे. त्यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया येत्या शनिवारपासून (ता. १९) दुपारी बारा वाजल्यानंतर सुरू होणार आहे. मागील एक वर्षापासून चालू असलेल्या या कामाला आज मूर्त स्वरूप आले आहे. 

ऑनलाइन लॉटरी पद्धतीने या सदनिकांचे वाटप रीतसर व नियमानुसार करीत आहोत. इतक्‍या मोठ्या प्रमाणात प्रथमच घरकुलांचे वाटप होत आहे. याद्वारे आर्थिकदृष्ट्या गरीब व गरजू नागरिकांची घरांची मागणी पूर्ण होणार आहे.
- समरजितसिंग घाटगे, सभापती, म्हाडा, पुणे 

ऑनलाइन नोंदणी उद्यापासून; 30 जूनला सोडत

परिसर - सदनिका
नांदेड सिटी - १०८० 
रावेत, पुनावळे - १२० 
वाकड - २२ 
चऱ्होली वडमुखवाडी - २१४ 
मोशी - २३९ 
येवलेवाडी - ८० 
कात्रज - २९ 
धानोरी - ५१ 

गट                                                किंमत
इड्‌ब्लूएससाठी (३० चौ. मीटरपर्यंत)  - ९.५० लाख ते १७ लाख रुपये
एलआयजीसाठी (३० ते ६० चौ. मीटरपर्यंत) - १४ लाख ते २६ लाख रुपये
एमआयजी आणि एचआयजीसाठी (८० चौ. मीटर व त्यावरील) - २६ लाख रुपयांपासून पुढे 

अशी असेल उत्पन्नाची अट 
गट                         वार्षिक उत्पन्न
इडब्लूएस गट - ३ लाख रुपयांपर्यंत 
एलआयजी गट - अट ३ ते ६ लाख रुपयांपर्यंत 
एमआयजी गट - ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत 
एचआयजी गट - ९ लाख रुपयांच्या पुढे 

सदनिकांची संख्या
गट            सदनिका

ईडब्लूएस    ४२९
एलआयजी    २ हजार ४०३
एमआयजी    २८३
एचआयजी    04

 

Web Title: mhada home draw