"म्हाडा'च्या तीन हजार घरांची लॉटरी निघणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (म्हाडा) प्राधिकरणाच्या पुण्यासह पाच जिल्ह्यांतील नियोजित घरांसाठी 2018 या वर्षातील लॉटरीबाबत लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्याची शक्‍यता आहे. 

म्हाडाच्या पुणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये 58 ठिकाणी आर्थिक दुर्बल घटक, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी सुमारे तीन हजार घरे बांधण्यात आली आहेत. घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना पुण्यासह अन्य जिल्ह्यांतही सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा म्हाडाकडून प्रयत्न सुरू आहे. पुणे शहर परिसरातही म्हाळुंगे, पुनावळे, रावेतसह अन्य भागांत ही घरे उभारण्यात आली आहेत. याबाबत 13 मे रोजी म्हाडाकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: MHADA lottery will open for 3000 houses