पुणे : म्हाडाची ऑनलाइन सोडत 7 जूनला

download.jpg
download.jpg

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत येणाऱ्या चार हजार 756 सदनिकांसाठी शुक्रवारी (ता. 7) सकाळी दहा वाजता अल्पबचत भवन येथे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. या सदनिकांसाठी एकूण 41 हजार 501 जणांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिली. 

ऑनलाइन सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. सोडतीची संपूर्ण प्रक्रिया आणि निकाल वेबकास्टवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांना सोडतीचे संपूर्ण प्रक्षेपण वेब कास्टिंगद्वारे www.bit.ly/punemhada_live2019 या यू-ट्यूब लिंकवर ऑनलाइनही पाहता येईल. या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या अर्जदारांनी पात्रतेबाबतची कागदपत्रे कॅनरा बॅंकेच्या कोणत्याही एका शाखेत सहा जुलैपर्यंत प्रत्यक्ष जाऊन अपलोड करावयाची आहेत. 

म्हाडाची पुढील सोडत ऑगस्टअखेर
"म्हाडाच्या पुणे मंडळांतर्गत सदनिकांसाठी पुढील जाहिरात ऑगस्टअखेरीस
निघणार आहे. त्यात म्हाडाच्या तीन हजार 351 सदनिका आणि 20 टक्के
सर्वसमावेशक योजनेतील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एकूण एक हजार 393 सदनिका अशा एकूण मिळून चार हजार 744 सदनिकांचा समावेश असेल,'' अशी माहिती म्हाडाच्या वतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com