एमएचटी-सीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी ‘एमएचटी-सीईटी २०१९’ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विद्यार्थी, तज्ज्ञ, नागरिक यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

दरवर्षी राज्यातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. प्रवेश नियामक प्राधिकरणाने सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाइन घेण्यास सुचविले आहे. ‘एमएचटी-सीईटी २०१९’ प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत विद्यार्थी तसेच पालक, तज्ज्ञ व्यक्ती, सामान्य नागरिकांनी ‘www.mahacet.org’ या संकेतस्थळावर आपली मते, सूचना कराव्यात, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आवाहन केले आहे. संकेतस्थळावर त्यासाठी प्रश्‍नावलीदेखील देण्यात आली. ती भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली असल्याचेही परीक्षा कक्षातर्फे सांगण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही परीक्षा ऑनलाइन करण्याचा विचार आहे. त्यानुसार साधारणपणे १६ ते २० दिवस हा परीक्षेचा कालावधी असून, मे २०१९ मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे.

Web Title: MHT CET Exam Online