उद्योग, व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून प्रशासन करतेय अशी तयारी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

- आवश्यकता असलेल्या ठिकाणीच मायक्रो कंटेन्मेंट झोन 

- उद्योग, व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी

पुणे : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी सूक्ष्म नियोजन करुन आवश्यकता आहे, त्याच परिसरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण हवेली तालुक्यात आहेत. येथील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे शहरानजीक असणाऱ्या चाकण, तळेगाव, हिंजवडीसह अन्य औद्योगिक क्षेत्रांच्या कामावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना प्रतिबंधासाठी जुन्नर तालुक्यात सर्व यंत्रणांच्या समन्वयाने उत्तम नियोजन केले आहे. त्या धर्तीवर अन्य तालुक्यांत देखील विविध विभागांच्या मदतीने सूक्ष्म नियोजन करुन कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परराज्यांतील ‌सव्वा लाख कामगारांना पाठविणार

बिहार आणि उत्तरप्रदेशात परतण्यासाठी इच्छुक सुमारे 1 लाख 21 हजार कामगारांना परवानगी मिळवून देण्यासाठी तेथील प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून परवानगी प्राप्त झाल्यावर पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रशासनाची परवानगी मिळाल्यावर विद्यार्थी आणि कामगारांना परतण्यासाठी पासेस वेळेत तयार करावेत. प्रादेशिक परिवहन विभागाने बसेस उपलब्ध करुन द्याव्यात. निवारागृहातील मजुरांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था चोख पार पाडून याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: micro containment zones may created in Essential places in Pune due to Coronavirus Issue