अरे वा, कोथरुडमध्ये कोरोना मुक्तीसाठी राबविला जाणारा 'हा' पॅटर्न

kothrud.jpg
kothrud.jpg

कोथरुड (पुणे) : कोथरुडमधील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाने सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) पध्दतीचा वापर सुरु केला असून त्याला चांगले यश मिळत असल्याची माहिती कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले. वस्ती पातळीवर सर्व्हेक्षण, कोरोना संशयितांचे विलगीकरण, तपासणी व उपचार, परिसरात फवारणी अशा पध्दतीच्या उपाय योजना अंमलात आणण्यात येत आहेत. अॅंटीजेन रॅपिड टेस्ट करण्याची सुविधा राऊत दवाखाना व अण्णासाहेब पाटील शाळेत करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाला पाॅझीटीव्ह रूग्ण निश्चिती जल्द गतीने होवून त्यांचा इतरांशी येणारा संपर्क तोडून साखळी तोडणे शक्य होत आहे.

कोथरुड मधील हॉटस्पॉट समजल्या जाणा-या पीएमसी कॉलनी, मराठा महासंघ सोसायटी, श्रीकृष्ण नगर, राजीव गांधी पार्क, एआरएआय रोड केळेवाडी, वसंत नगर, इंदिरापार्क, भगत आळी या परिसरातील रुग्ण संख्या शून्यावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. सध्या कोथरुड मधील हॉटस्पॉट मानल्या गेलेल्या भागांची संख्या 21 आहे. यापैकी 8 भागात शून्य संख्या तर 6 भागात ही संख्या 1 इतकी आहे. मंगळवारी संध्याकाळ पर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोथरुडमध्ये आत्तापर्यंत 1679 जणांना कोरोनाची लागण झाली. यातील 1263 जण कोरोनामुक्त झाले. 24 जणांचा मृत्यू झाला. 392 जणांवर उपचार सुरु आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवतीर्थनगर, रामबाग कॉलनी, जयभवानीनगर, किष्किंधानगर, सुतारदरा, परिसरातील रुग्णसंख्या जास्त आहे. त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरु आहे. या भागात आत्तापर्यंत ४०९ रुग्ण आढळले असून १३३ उपचार सुरु आहेत. २७१ लोक कोरोना मुक्त झाले तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल शिवशक्ती मित्र मंडळ परिसरात आत्तापर्यंत १२० रुग्ण आढळले असून यातील ८८ जण कोरोनामुक्त झाले तर ३० जणांवर उपचार सुरु आहेत. २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे सोपे जावे म्हणून एमआयटीच्या वसतीगृहात तीनशे खाटांचे कोविड सेंटर सुरु करणार आहेत. बालेवाडी व विप्रोच्या कोविड सेंटरवरील ताण कमी करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना बाधितांना दूर जाण्याऐवजी कोथरुड परिसरातच सोय होत असल्याने ते सर्वांसाठी सोईस्कर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com