एमआयडीसी कार्यालयात गोंधळ घालून कर्मचाऱ्यास दिले ढकलून

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पाच जणांनी कार्यालयात गोंधळ घालून कर्मचाऱ्यास ढकलून दिले. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजता वाकडेवाडी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

पुणे - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पाच जणांनी कार्यालयात गोंधळ घालून कर्मचाऱ्यास ढकलून दिले. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजता वाकडेवाडी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महादेव मोतीराम साबळे (वय 36 रा. अजंठानगर, चिंचवड) याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनील सरोदे (वय 54, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरोदे हे वाकडेवाडीतील एमआयडीसी कार्यालयात नोकरीला आहेत. गुरूवारी दुपारी महादेव साबळे व अन्य चार महिला संबंधीत कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या.

सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती

एमआयडीसीच्या जागेवर समाजमंदीर उभारण्याच्या विषयासाठी त्यांना अधिकाऱ्यांना भेटायचे होते. मात्र बैठक सुरू असल्याने अधिकारी त्यांना भेटू शकत नव्हते, त्याबाबत सरोदे यांनी त्यांना माहिती दिली. त्यानंतरही ते बैठकीच्या ठिकाणी जाऊ लागल्याने फिर्यादीने त्यांना अडविले. त्यावेळी साबळे व त्याच्यासमवेतच्या महिलांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत गोंधळ घातला. त्याचबरोबर त्यांना अडविणाऱ्या सरोदे यांना ढकलून दिले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण करीत आहेत.

पुण्यात शाळेची घंटा वाजणार; पालकांची लेखी मंजुरी अत्यावश्यक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIDC office messed up and pushed the employee crime