१० रुपयांत प्रवास सुविधा देणाऱ्या मिडी बस शहरात दाखल

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहराच्या मध्यभागात १० रुपयांत प्रवास करण्याची सुविधा देणाऱ्या नव्या मिडी बस शहरात दाखल झाल्या.
Midi Bus
Midi BusSakal

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहराच्या मध्यभागात १० रुपयांत प्रवास (Journey) करण्याची सुविधा देणाऱ्या नव्या मिडी बस (Midi Bus) शहरात दाखल झाल्या आहेत. स्वारगेट ते शिवाजीनगर दरम्यान या बस धावतील. त्यासाठीचे वेळापत्रकही पीएमपी प्रशासनाने (PMP Administrative) तयार केले आहे. (Midi Bus Enters in Pune City)

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. त्यानुसार सुमारे १५ कोटी रुपयांत या ५० बस दाखल झाल्या आहेत. या बस सीएनजीवर धावणाऱ्या असून, त्यांची लांबी नऊ मीटर आहे. या बसची खरेदी महापालिकेने केली आहे.

नव्या योजनेसाठी सुमारे ३०० बस खरेदी कराव्या लागणार आहेत. त्यासाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या सहा महिन्यांत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे मनपा

वाहतुकीला परवानगी मिळाली की या बस मार्गांवर धावतील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकासह अन्य तयारी पूर्ण करण्यात येईल.

- चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Midi Bus
कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण

शहरात सहा ठिकाणी सेवा

स्वारगेट-शिवाजीनगर मार्गाच्या धर्तीवर डेक्कन-वारजे, डेक्कन-कोथरूड, पुणे स्टेशन-विश्रांतवाडी, स्वारगेट-हडपसर, स्वारगेट-बिबवेवाडी आदी मार्गांवरही दहा रुपयांत बससेवा सुरू करण्यात येणार आहे. शहरात एकूण सहा ठिकाणी ही योजना राबविण्यास पीएमपी प्रशानसाला सांगितले आहे. त्याबाबत चर्चाही झाली असून, पीएमपीच्या संचालक मंडळानेही या योजनेस मान्यता दिली आहे. उर्वरित पाच ठिकाणे पीएमपीला सुचविली आहेत. परंतु, अंतिम निर्णय त्यांच्याकडूनच जाहीर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com