कालवाफुटीची टांगती तलवार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

खडकवासला : शहरातून 28 किलोमीटर लांबीचा मुठा कालवा वाहतो. कालव्यालगतचा सेवा व निरीक्षण रस्ता, कालव्यावरील विविध पूल खचणे, कालव्याच्या भरावावरील अतिक्रमणे असे विविध प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पुन्हा कालवाफुटीच्या दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी, अशा मागणीचे पत्र पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांना दिले आहे. 

कालव्यालगत असलेल्या भरावावर, कालव्याच्या सेवारस्त्यावर रस्त्यांचे अतिक्रमण झालेले आहे. तेथे पालिकेने कोणतीही परवानगी न घेता शहर हद्दीत अनेक ठिकाणी डांबरी, कॉंक्रीट रस्ते केले आहेत. त्यावरून हलकी, जडवाहतूक सुरू आहे. अशा ठिकाणी बांधकामास तडे गेले आहेत. येथे पालिकेने तातडीने दुरुस्ती केली पाहिजे. 

कालव्याच्या 28 किलोमीटरच्या हद्दीत सर्वच ठिकाणी पाण्यात कचरा टाकला जातो. प्रामुख्याने दांडेकर पूल, जनता वसाहत, डायस प्लॉट, शिंदे वस्ती, बीटी कवडे रस्ता, ससाणेनगर व हडपसर येथे अतिक्रमण झालेले आहे. कालव्यात राडारोडा टाकल्यामुळे पाणी वाहण्याच्या वेगावर मर्यादा येतात. 
वडगाव बुद्रुक व स्वारगेट, महर्षीनगर येथे ओढ्यावरील जलसेतुची गळती होत आहे. त्याच्या दुरुस्तीची मागणी आहे. 

उपाययोजना काय 

1) कालव्यालगत कचराकुंड्या ठेवून कचऱ्यावर बंधने आणावीत. 
2) कालव्याच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका व अतिक्रमण विभागाने पुढाकार घ्यावा 
3) तेथे झोपड्या होऊ नयेत म्हणून लोखंडी जाळ्या बसवाव्यात 
पर्वती ते लष्करदरम्यान जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे कालव्यास धोका निर्माण होणार नाही असे काम करावे. 

सिंचनावर परिणाम 

कालव्यातून पालिकेला व सिंचनाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्याची दुरुस्ती करता आली नाही. जनता वसाहत येथील रस्त्या खचल्याने आम्ही दगड-माती कालव्यात टाकली आहे; परंतु पालिकेला वरील बाजूने रस्त्याचा स्लॅब, संरक्षण भिंत, कालव्याची भिंत, बांधून घ्यावी लागणार आहे.

यासाठी पालिकेला किमान पाच-सहा दिवस लागतील असे वाटते. त्यामुळे शेतीसाठी दौड-इंदापूरला सोडण्यात येणाऱ्या सिंचनाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. 

Web Title: Might be Kalva Brokege in Pune