दास्ताने दांपत्याने विकलेले सोने पोलिसांनी केले जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

पीएनजी ब्रदर्सची 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दास्ताने दांपत्याने विक्री केलेले 6 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. न्यायालयाने दास्ताने दांपत्याच्या पोलिस कोठडीत 25 जूनपर्यंत वाढ केली आहे.

पुणे - पीएनजी ब्रदर्सची 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दास्ताने दांपत्याने विक्री केलेले 6 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. न्यायालयाने दास्ताने दांपत्याच्या पोलिस कोठडीत 25 जूनपर्यंत वाढ केली आहे.

"तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने, त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने ऊर्फ सायली बालाजी पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) यांना फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दास्ताने यांच्या घराच्या झडतीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदी आणि विक्रीच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात दास्ताने यांनी दागिने गहाण ठेवल्याचे तसेच, ते विकल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी विक्री केलेले 6 लाख 30 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

दास्ताने यांनी त्यांच्याकडील सोन्याची साखळी, हिऱ्यांची अंगठी मित्रामार्फत कोल्हापूर येथील सराफाला विकली आहे. काही सोने आळंदी येथील पतसंस्थेत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले आहे. सोन्याची विक्री करून आलेल्या पैशातून त्यांनी परदेशवारी केल्याचेही तपासात समोर आले आहे, असे सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी न्यायालयास सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Dastane Gold Seized Crime