उंडवडी सुपेत शेतकऱ्यांनी दूध ओतले रस्त्यावर 

milk
milk

उंडवडी -  दूधाला बाजारभाव मिळत नसल्याने दूग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे.  दुधाला पाच रुपयांची दरवाढ मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे येथील काही शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून पाठिंबा दिला. व सरकारचा निषेध नोंदविला. 

मध्यरात्रीपासून शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलनाचा प्रारंभ केला. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उंडवडी सुपे येथील शेतकऱ्यांनी आपले दूध डेअरीला न देता बारामती- पाटस रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करत दूध बंदला पाठींबा दिला. 

जिरायती भागात अद्यापही पाऊस नसल्याने पाणी टंचाई आणि चारा टंचाईने शेतकरी हतबल झाले आहेत. यातच दूधाचे दर घसरत चालले आहेत. सरार्स शेतकरी बागायती भागात जावून जनावरांना चारा विकत आणत आहे. ऐन पावसाळ्यात चारा विकत घेवून जनावरे जगविण्याची वेळ दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. 

त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे दूधाला दर नाहीत आणि दुसरीकडे हिरव्या चाऱ्यासाठी बागायती भागात जावून वणवण सुरु आहे. 

दूधाला पाच रुपयांनी दर वाढवून मिळावा, यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने जिरायती भागातील दूध उत्पादक शेतकरी पाठिंबा देवू लागले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी दूध आज डेअरीला न घालता घरी ठेवून पेढे व खवा करणे पसंद केले. 

जिरायती भागात इतर गावागावांतील शेतकऱ्यांचे दूध सर्व डेअरी आणि बारामती दूध संघाने स्विकारले आहे. मात्र अजून दूध टॅंकर मध्ये भरुन गावागावातून गेलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com