सणसरला अभिनव पद्धतीने आंदोलन

सणसर (ता. इंदापूर) - दूधदरवाढीच्या अभिनव आंदोलनात बांबूच्या तिकोट्यावर ठेवलेल्या मडक्‍यातील दूध तापविताना आंदोलक.
सणसर (ता. इंदापूर) - दूधदरवाढीच्या अभिनव आंदोलनात बांबूच्या तिकोट्यावर ठेवलेल्या मडक्‍यातील दूध तापविताना आंदोलक.

भवानीनगर - सणसरच्या कुरवली चौकात गुरुवारी बिरबलाच्या गोष्टीतल्या खिचडीसारखेच खूप उंच मडक्‍यात ठेवलेल्या दुधाला साय आणायची कृती सुरू होती. मात्र, खूप वेळ जळण जाळूनदेखील दूध अखेर शिजलेच नाही. त्यामुळे सरकारी धोरणाचा निषेध करीत हजारो लिटर दूध आंदोलकांनी रस्त्यावर ओतून दिले. 

सणसर (ता. इंदापूर) येथे रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते व शिवसेनेच्या युवासेनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली दूधदरवाढीसाठी अभिनव आंदोलन करण्यात आले. येथील कुरवली चौकात गुरुवारी सकाळी तीन बांबू बांधून त्याला दुधाने भरलेले मडके बांधण्यात आले. जवळपास दहा ते चौदा फूट उंचावर बांधलेल्या या मडक्‍यातले दूध सरकारी अद्यादेशांच्या प्रती पेटवून, त्याचा जाळ करून तापवायचे होते. मात्र, या दोन्हींमध्ये मोठे अंतर असल्याने अपेक्षेप्रमाणे दूध काही तापले नाही, परिणामी संतापलेल्या दूध उत्पादक व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर हजारो लिटर दूध ओतून दिले. या आंदोलनात नवनाथ बनसोडे, हनुमंत वीर, संजय सोनवणे, राजेंद्र जामदार, विष्णूपंत कदम, सेनेचे राहुल जगताप, विजय गायकवाड, अजय सोनवणे, पार्थ निंबाळकर, आबासाहेब निंबाळकर आदी सहभागी होते.

सरकार आणि विरोधक मावसभाऊ - रायते
पांडुरंग रायते म्हणाले, ‘२०१७ मध्ये सरकारने २७ रुपये प्रतिलिटरची घोषणा केली. प्रत्यक्षात भाव मिळत नसूनही सरकार कारवाई करीत नाही. यामुळे राज्यात रोज शेतकऱ्यांची १८ कोटींची लूट होते. आदेश काढल्यापासून आजपर्यंत ७ हजार २०० कोटींची लूट झालेली आहे. याबाबत अजूनही सरकार दुर्लक्षच करीत आहे. सरकार आणि विरोधक हे मावसभाऊच आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com