रेशन दुकानात दूध आणि दुधाचे पदार्थ

विवेक शिंदे  
बुधवार, 11 एप्रिल 2018

महाळुंगे पडवळ - आरे ब्रॅंडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रेशन दुकानांतून विक्री करण्यास राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आता दूध उपलब्ध होणार आहे.        

महाळुंगे पडवळ - आरे ब्रॅंडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रेशन दुकानांतून विक्री करण्यास राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आता दूध उपलब्ध होणार आहे.        

राज्यातील सर्व अधिकृत रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे (महानंद) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आरे ब्रॅंडचे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण राज्यातील रेशन दुकानांतून विक्री करण्याची परवानगी देण्याची विनंती कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने केली होती. त्यानुसार परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. शासकीय दूध योजनेच्या, तसेच आरे ब्रॅंडच्या अधिकृत वितरकांमार्फत राज्यातील रेशन दुकानदारांपर्यंत या योजनांचे दूध वितरण करण्यात येईल. दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीपोटी मिळणाऱ्या कमिशनसाठी रेशन दुकानदारांचा संबंधित दूध योजनांच्या वितरकांशी संबंध साधणे आवश्‍यक आहे. हा व्यवहार दुग्धशाळा, आरे ब्रॅंड व संबंधित रेशन दुकानदार यांच्यामध्ये राहील, यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.

‘सरकारने झुलवत ठेवले’
‘‘सरकारकडे रेशन दुकानदारांनी मानधनवाढीसाठी वारंवार मागणी केली आहे. मात्र, मानधनवाढ न करता सरकारने फसव्या घोषणा देऊन आम्हाला झुलवत ठेवले. यापूर्वी सरकारने रेशन दुकानांतून भाजीपाला, बी-बियाणे विक्रीसारखे निर्णय घेतले होते. त्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदारांनी त्याबाबत फारसा उत्साह दाखविला नव्हता. आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याची घोषणा केली आहे,’’ असे आंबेगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सदस्य सुभाष पडवळ यांनी सांगितले.

Web Title: Milk and milk products in ration shops