Coronavirus : नाणे मावळात दूध उत्पादक शेतकरी संकटात

milk
milk

करंजगाव -  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुणे,पिंपरी-चिंचवड,लोणावळा आदी शहरी भागात मावळातील दूध उत्पादक दूध विक्री वर्षांनुवर्षे करत आहेत परंतु इतिहासात प्रथमच झालेल्या लॉकडाऊनमुळे दूध विक्री बंद झाली आहे.

अनेक खाजगी दूध संकलन केंद्रे ही बंद आहेत. इतर दूध संघ जास्तीचे दूध घेण्यास नकार देत असताना दुधाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच-पन्नास लिटर पासून शंभर लिटर दूध असणाऱ्या शेतकऱ्यांचे दूध विक्री होत नसल्याने त्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे.जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही अनेकांना घराबाहेर पडता येत नाही.वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना कामशेत या बाजारपेठेत येता येत नाही.परिणामी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनाही गॅस सिलेंडर,किराणा,पालेभाज्या आदींच्या खरेदीच्या  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

लॉकडाऊनमध्ये शाश्वत शेतीच ठरतेय वरदान -
ग्रामीण भागातील अनेकांनी शेती करणं कमी केलं आहे.काही जण फक्त भात शेती करतात.मात्र जे शेतकरी शाश्वत शेती करत आहेत ते मात्र लॉकडाऊनमध्येही बिनदास्त असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्याकडे वर्ष-दीड वर्ष पुरेल इतके धान्य आहे.याशिवाय शेतात विविध प्रकारच्या पालेभाज्या आहेत.घरात गाई-म्हशी असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची कमतरता नाही.त्यांना गॅस सिलेंडरचेही'टेन्शन नाही कारण त्यांच्याकडे'गोबरगॅस'ची देखिल सोय आहे.संपूर्ण कुटुंब शेतीच करत असल्याने लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्याची आवश्यकता पडत नाही.म्हणून लॉकडाऊनमध्ये शाश्वत शेतीच ठरतेय वरदान ठरतं आहे.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com