प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे - दूध भुकटीला दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे अनुदान देताना शेतकऱ्यांना किती दर द्यायचा याची स्पष्टता करावी. तसेच कर्नाटकच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १२ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती दूध उत्पादक आणि प्रकिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली. 

संघाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. यावेळी उपाध्यक्ष गोपाळराव मस्के, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, प्रभात दूध संघाचे सारंग निर्मळ, डॉ. विवेक क्षीरसागर आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, की दूध भुकटीचे दर कोसळल्याने खासगी आणि सहकारी संस्था अडचणीत आहेत. त्यामुळे दुधालाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरीही अन्याय होत आहे. 

दूध उत्पादकांना मदत करण्यासाठी कर्नाटक सरकार प्रतिलीटरअनुदान देते. शालेय मुलांना पोषक आहार म्हणून दूध भुकटी दिली जाते. आपल्याकडे दूध भुकटीला अनुदान देऊन शेतकऱ्यांना मदत केल्याचे भासवले जात अाहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तेथे मार्ग निघाला नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. 

दुधाचे विक्रीचे दर कमी करण्यासाठी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व संस्थांचे खरेदी दर पाहून विक्रीचे दर दहा दिवसांमध्ये ठरविण्याचे यावेळी निश्‍चित करण्यात आले असल्याचेही विनायकराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: milk give a subsidy of Rs 5 per liter