आंबेगाव : दूध उत्पादकांची दिवाळी होणार गोड; 38 लाखांचा बोनस 

डी. के. वळसे-पाटील
Tuesday, 10 November 2020

पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेने दिवाळीनिमित्त ३८ लाख तीन हजार ७०९ नऊ रुपये बोनसचे वाटप २५० दूध उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

मंचर : पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेने दिवाळीनिमित्त ३८ लाख तीन हजार ७०९ नऊ रुपये बोनसचे वाटप २५० दूध उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे. ४६ हजार रुपयांपासून ते सर्वाधिक एक लाख ७५ हजार ४९८ रुपयापर्यंत बोनस रक्कम दुध उत्पादकांना मिळाली आहे.त्यामुळे दुध उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे.

अजित पवारांचे 'कमबॅक'; कोरोना आणि विश्रांतीनंतर पु्न्हा कामाचा धडाका!​

यावर्षी दोन लाख ४२ हजार ९४० रुपये नफा दूध संस्थेला झाला आहे. अशी माहिती श्रीराम दूध उत्पादक सहकारी  संस्थेचे अध्यक्ष आत्माराम सोनू कुरकुटे यांनी दिली. 

''दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दर महिन्याला सरासरी दोन लाख आठ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. वर्षभरात एकूण २५ लाख दोन हजार ४४० लिटर दूध सहकारी दुध संस्थेने  संकलित  केले आहे. संकलित झालेल्या सर्व दुधाची खरेदी मंचर येथील आकाश दूध  प्रकल्पामार्फत करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दर पंधरा दिवसाला आकाश दूध प्रकल्पाचे अध्यक्ष संजय थोरात यांच्या माध्यमातून दूध संस्थेला खरेदी  दुधाचे पैसे दिले जातात. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे वेळेवर पगार होतात. खरेदी दरातील फरक म्हणून प्रति लिटरला एक रुपया ५२  पैसे याप्रमाणे बोनस रक्कम दुध उत्पादकांना देण्यात आली आहे, अशी माहिती दूध संस्थेचे संचालक रामनाथ बांगर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk producers will get a bonus of Rs 38 lakh in manchar

Tags
टॉपिकस
Topic Tags: