दुधाला जादा भाव देणार - पशुसंवर्धनमंत्री जानकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

तळेगाव ढमढेरे - मत्स्यशेती व कुक्कुटपालनासाठी होतकरूंना सरकारतर्फे ५० टक्के अनुदान देण्याचा विचार आहे. दुधाला जादा भाव देण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न चालू आहेत. ११० कोटींचे बजेट पशुसंवर्धन विभागासाठी मंजूर झाले आहे. विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे रस्त्याच्या भूमिपूजन व विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रसंगी जानकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी आमदार बाबूराव पाचर्णे होते. या वेळी विठ्ठलवाडी ते तळेगाव ढमढेरे या साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन आणि अंतर्गत गटार योजना, सिमेंट काँक्रीट रस्ता, जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन व शेतकऱ्यांना अवजारांचे वाटप जानकर यांच्या हस्ते झाले.

आमदार बाबूराव पाचर्णे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह मिलिंद देशपांडे, दादापाटील फराटे, सुदर्शन चौधरी, रेखा बांदल, निवृत्ती अण्णा गवारे, राहुल गवारे आदींची भाषणे झाली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, संभाजीअप्पा गवारे, बाळासाहेब चव्हाण, विजय रणसिंग, विकास शिवले, संदीप ढमढेरे, राजेश लांडे, रामभाऊ सासवडे, श्रीकांत सातपुते, दिलीप शेलार, गोरक्ष काळे, धर्मेद्र खांडरे, सरपंच ललिता गाडे, दिलीप गवारे, किसन गवारे, जयश शिंदे, हिरामन गवारे, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल गवारे यांनी केले. सूत्रसंचालन रघुनंदन  गवारे यांनी केले. उपसरपंच बाबाजी गवारे यांनी आभार मानले.

गवारे यांच्या कार्याचा गौरव  
तालुक्‍यात सुमारे १०० किलोमीटरचे रस्ते मंजूर असून विविध रस्त्यांच्या प्रास्तावासह मंत्रालयीन व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्यासाठी बाजार समितीचे संचालक राहुल गवारे यांनी भरीव मदत केली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच तालुक्‍याला रस्ते मिळाले, असे मंत्री महादेव जानकर व आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.

Web Title: milk rate mahadev jankar