दुधाच्या विक्री दरात चार रुपयांची कपात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

बारामती - परराज्यातील दुधाच्या ब्रँडशी स्पर्धा व राज्यातील दूध उत्पादकांचे हित साधण्याच्या दृष्टीने खासगी प्रकल्पांनी दुधाच्या विक्री दरात १६ जूनपासून ४ रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामती - परराज्यातील दुधाच्या ब्रँडशी स्पर्धा व राज्यातील दूध उत्पादकांचे हित साधण्याच्या दृष्टीने खासगी प्रकल्पांनी दुधाच्या विक्री दरात १६ जूनपासून ४ रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी दूध प्रकल्पांच्या प्रमुखांची येथील सिटीइन हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस सोनाई, ऊर्जा, गोविंद, किसान, संतकृपा, नेचर डिलाईट, स्वयंभू, शांताई, अनंत, शिवप्रसाद, माऊली, नॅचरल, कन्हैया, गोशक्ती, जे. डी. थोटे आदी प्रकल्पांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
या संदर्भात ऊर्जाचे प्रकाश कुतवळ म्हणाले, की राज्यात ९० लाख लिटर दुधाची दररोज विक्री होते. त्यात अमूलचा वाटा २५ लाखांवर व इतर परराज्यातील दूध प्रकल्पांचा ५ लाख लिटर एवढा वाटा आहे. राज्यातील दूध उत्पादकांचा खप ६० लाख लिटरवर आला आहे. एकीकडे उत्पादन वाढत आहे. तर, दुसरीकडे परराज्यातील विक्री वाढत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास राज्यातील दूध प्रकल्प अडचणीत येतील, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: milk sailing rate 4 rupees decrease