पुणे शहरात दूध पुरवठा पुर्ववत सुरू 

milik.jpg
milik.jpg

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून  (ता.१४) सुरू झालेल्या कडक लॉकडाउनचा शहरातील दूध वितरणाला कांहींही अडथळा  निर्माण झाला नाही. लॉकडाउनमध्येही दूध वितरणाला परवानगी असल्याने कडक लॉकडाउनच्या आजच्या पहिल्या दिवशीसुद्धा नेहमीप्रमाणे दूध पुरवठा सुरळीत होता. आज शहरात सुमारे दहा लाख लिटर दूधाचे वितरण झाल्याचा प्राथमिक अंदाज विविध दूध संघांनी वर्तविला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे १५ लाख लिटर पिशव्यांमधील दूध लागत असते. मात्र मागील तीन महिन्यांपासून दररोजच्या मागणीत ५ लाख लिटरने घट झालेली आहे. मिठाई दुकाने, हाॅटेल्स आणि चहा टपऱ्या आणि शाळा महाविद्यालये बंद असल्याने ही घट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) कामकाज आज नियमितपणे सुरू होते. लॉकडाउनमधील नियमांचे पालन करत, शेतकऱ्यांकडील दूध घेण्यात आले आणि ग्राहकांना मागणीनुसार दिवसभर दूध उपलब्ध करुन देण्यात आल्याचे कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक  डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. 

नेहमीप्रमाणेच आजही पुणे करांना लॉकडाउनमध्येही चितळे दूध उपलब्ध करुन देण्यात आले. दूधाचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला. दूधाचा कसलाही तुटवडा नसल्याचे चितळे डेअरीचे भागीदार गिरीश चितळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com