#MilkAgitation 'देवा सरकारला सुबुद्धी दे'

किशोर कुदळे
सोमवार, 16 जुलै 2018

शेती आणि शेती पूरक व्यवसाय असलेल्या दुग्धोत्पादनात दूधाला बाजारभाव मिळत नसल्याने दूग्धोत्पादन व्यवसाय अडचणीत आला आहे. कमीत कमी या व्यवसायातील खर्च तरी निघावा यासाठी दुधाला किमान पाच रुपयांची दरवाढ मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला
जेऊर (ता.पुरंदर) येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून पाठिंबा दिला.यावेळी गावातील शंभू महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक घालून या सरकारला सुबुद्धी दे असे साकडे देखील घालण्यात आले.

 

वाल्हे : शेती आणि शेती पूरक व्यवसाय असलेल्या दुग्धोत्पादनात दूधाला बाजारभाव मिळत नसल्याने दूग्धोत्पादन व्यवसाय अडचणीत आला आहे. कमीत कमी या व्यवसायातील खर्च तरी निघावा यासाठी दुधाला किमान पाच रुपयांची दरवाढ मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाला
जेऊर (ता.पुरंदर) येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून पाठिंबा दिला.यावेळी गावातील शंभू महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक घालून या सरकारला सुबुद्धी दे असे साकडे देखील घालण्यात आले.

काल मध्यरात्रीपासून शेतकरी संघटनेने दुध संकलन बंदच्या पुकारलेल्या आंदोलनाला प्रारंभ झाला. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांनी आपले दूध डेअरीला न देता गावातील शंभू महादेवाला दुग्धाभिषेक घालुन साकडे घालुन रस्त्यावर दूध ओतून सरकारचा 
निषेध केला. यावेळी यावेळी शेतकरी संघटनेचे अशोक धुमाळ,अप्पासो धुमाळ, पुरंदर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष हनुमंत पवार, चंद्रकांत धुमाळ, माधव धुमाळ, राजेंद्र पवार, रणजीत पवार, दत्तात्रय धुमाळ, सुहास धुमाळ, बाबुराव धुमाळ, बाळासो धुमाळ, नितीन धुमाळ, हिरामण धुमाळ, राजेंद्र पवार, सिताराम धुमाळ, निलेश धुमाळ आदी उपस्थित होते. 

आंदोलनाबाबत बोलताना शेतकरी संघटनेचे अप्पा धुमाळ म्हणाले कि, या सरकारने अगोदरच शेतकऱ्यांना वाईट दिवस दाखवले आहेत. त्यातून सावरण्यासाठी शेती
पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु केला तर उत्पादन खर्चाच्या निम्म्या किमतीत शेतकऱ्यांना दुध विकावे लागत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून भांडवलदारांचे आहे. असा आरोप करीत जोपर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाला लीटरमागे पाच रूपये अनुदान शासन मंजूर करीत नाही, तोपर्यंत सर्व दुध उत्पादक शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होऊन दुधाचा एक थेंब देखील शहरांकडे जाऊ देणार नाहीत असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Web Title: MilkAgitation farmers pray to god