#MilkAgitation दूध वितरण व्यवस्था आज पूर्ववत होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पुणे - दूधदरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांनी दूध घातले नाही. परिणामी, चितळेसह अन्य खासगी दूध संघांची दूध वितरण व्यवस्था गुरुवारी पूर्णपणे बंद होती; परंतु बफर स्टॉकमुळे काही ठिकाणी जादा दराने दूधविक्री केल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, नागपूर येथे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत दूध दरवाढीवर तोडगा निघाला असून, दूध संकलन केंद्रांवर दूध संकलित होऊ लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील दूध वितरण व्यवस्था शुक्रवारी पूर्ववत होणार आहे.

खासगी दूध संघाकडून दूध वितरण बंद असल्यामुळे कात्रज दूध संघाच्या दूध विक्रीत 25 हजार लिटरने वाढ झाली. संघाकडे रोज एक लाख 25 हजार लिटर दूध संकलित होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बफर स्टॉकमधून अतिरिक्त दुधाचा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.

आंदोलनामुळे दूधपुरवठा होत नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्या. त्यामुळे स्थानिक दुकानदारांनी दूध पिशव्या दडवून ठेवल्या. याच पिशव्या जादा दराने विकल्या जात होत्या. त्यामुळे नागरिकांना भुर्दंड सोसावा लागला.
- अनिल पाटील, दूध ग्राहक

पुणे शहराला चितळे दूध शुक्रवारपासून पूर्ववत होईल. डेअरी आणि संकलन केंद्रांवर सुमारे पाच लाख लिटर दूध संकलित झाले आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची 90 टक्के मागणी पूर्ण होऊ शकेल.
- श्रीकृष्ण चितळे, संचालक, चितळे दूध

Web Title: #MilkAgitation milk distribution continue