#MilkAgitation एक लाख लिटर दुधाचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पिंपरी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या दूध आंदोलनाचा मंगळवारी (ता. १७) शहराच्या दूधपुरवठ्यावर परिणाम झाला. शहराला एक लाख लिटर कमी दुधाचा पुरवठा झाल्यामुळे काही भागात दुधाचा तुटवडा जाणवत होता. पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाच ते साडेपाच लाख लिटर दुधाची आवश्‍यकता असते. हा पुरवठा सांगली, कोल्हापूर, नगर, संगमनेर या भागातून मोठ्या प्रमाणात होत असतो. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दूध आंदोलनामुळे सोमवारी शहराला नियमितपणे दुधाचा पुरवठा झाला होता.

मात्र, मंगळवारी काही डेअऱ्यांकडून दुधाचा पुरवठा न झाल्यामुळे तुटवडा जाणवला. कोल्हापूरहून येणाऱ्या एका दूध उत्पादकाची गाडी फोडल्यामुळे त्यांचे दहा हजार लिटर दूध पोचू शकले नसल्याचे दूध पुरवठादार भास्कर बोरुडे यांनी सांगितले. दरम्यान, शहराला आवश्‍यक असणारा दुधाचा पुरवठा करण्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही. पोलिस बंदोबस्तामध्ये दूध पोचवण्यात येईल, असे आश्‍वासन सरकारकडून देण्यात आल्याचे बोरुडे यांनी सांगितले. 

Web Title: #MilkAgitation milk shortage