#MilkAgitation पिंपळगावला रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 19 जुलै 2018

मंचर (पुणे): दूध बंद आंदोलनाला आंबेगाव तालुक्‍यात चौथ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 19) शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.

मंचर (पुणे): दूध बंद आंदोलनाला आंबेगाव तालुक्‍यात चौथ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. 19) शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.

शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी नाशिक रस्त्यावर मंचर येथे आंदोलन करण्याची तयारी केली होती. पण, मंचरला आंदोलक येऊ नयेत, अशी यंत्रणा प्रशासनाने कार्यरत केली. त्यामुळे मंचरऐवजी पिंपळगाव येथे बांगर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त दूध उत्पादकांनी आंदोलन केले. या वेळी उपसरपंच धनेश पोखरकर, भरत बांगर, पंकज पोखरकर, राहुल बांगर, बाळासाहेब बांगर, शंकर पोखरकर, देवराम बांगर, अनिल बांगर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बांगर म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरूर तालुक्‍यात झालेल्या सभेत दूधदराचा प्रश्‍न मांडला होता. त्या वेळी पोलिसांनी आमच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी दुधाला योग्य दर देण्याची घोषणा केली होती. परंतु, अद्याप कार्यवाही झालेली नाही.''

खबरदारीचा उपाय म्हणून यावेळी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगावात व मंचर शहरातून जाणाऱया पुणे-नाशिक रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: MilkAgitation poured milk on the street at pimpalgaon manchar