अरे बापरे ! पुण्यातील `या` भागात होतोय लाखो लिटर पाण्याचा अपव्यव 

संदीप जगदाळे
शनिवार, 30 मे 2020

रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये वाहिनीतून गळती; महापालिकेचे दुर्लक्ष 

हडपसर (पुणे) : रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील पेट्रोल पंपाजवळ महापालिकेच्या लष्कर पाणी पुरवठा योजनेची वाहिनी फुटली आहे. सुमारे तीन महिन्यांपासून गळती सुरू असताना त्याकडे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रोज लाखो लिटर पाणी वाय जात आहे. 

अक्षय बोऱ्हाडे यांचा प्रवास : सायबर कॅफेतील कामगार ते सामाजिक कार्यकर्ता

रामटेकडी टाकीतून तुकाई टेकडी येथील पाण्याच्या टाकीकडे ही जलवाहिनी जाते. चोवीस तास ही वाहिनी चालू असल्याने त्यातून सतत गळती सुरू असते. एकीकडे हडपसर परिसरात अनेक भागात पाणीटंचाई आहे, तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे. मार्च महिन्यापासून येथील जलवाहिनी नादूरूस्त झाली आहे. 

दोघी बहिणींची भटकंती निसर्गसेवेसाठी

याबाबत अनेकदा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली, मात्र संबंधित अधिकारी जलवाहनीच्या दुरूस्तीकडे लक्ष देत नाहीत. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी प्रणित कापसे यांनी केली आहे. 

भीतीची छाया आणि त्यातही पुणेकरांसाठी आली गुड न्यूज

याबाबत लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले, ‘‘रामटेकडी औद्योगिक वसाहतीत जलवाहनीतून गळती होत असल्याची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. तथापि, प्रत्यक्ष ठिकाणाची पाहणी करून 
तातडीने जलवाहिनी दुरूस्ती केली जाईल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of liters of water wasted in hadpasr