सोशल मीडियावर ‘मीम्स’चा बोलबोला

Mims on social media
Mims on social media

पुणे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’चा दिलेला नारा.... राहुल गांधी सत्ताधाऱ्यांची उडविलेली खिल्ली असो, अथवा स्टाइल आयकॉन बॉलिवूड अभिनेत्यांनी केलेली एखादी कॉमेंट...‘मीम्स’मधून त्या बद्दल व्यक्त होण्याचा प्रकार सोशल मीडियावर सध्या पॉप्युलर झाला आहे. त्यातून नवी माहिती, ताज्या बातम्या काही क्षणात लाखो ‘नेटिजन्स’पर्यंत  पोचत आहेत.

‘मीम्स’मधून जगभरातील महत्त्वाचे ‘इव्हेंट्‌स’ फक्त एका छायाचित्रातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोचतात. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आदी घटकांवर ‘मीम्स’चे अधिराज्य आहे. कुठलेही मीम काही वेळासाठीच चर्चेत राहते. मध्यंतरी बेअर ग्रिल्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील मीम्स असतील किंवा हिंदुस्थानी भाऊचे मीम्स असतील, इंटरनेट जगतावरचे अनेक विषय मीम्समधून मांडले जातात.

तरुणांमध्ये स्वतःची लोकप्रियता वाढावी, यासाठी मीम्सचा वापर करण्याची क्रेझ सध्या आली आहे. तसेच मीम्स हे कुठलीही बातमी थेट पोचवण्याचे एक प्रभावी माध्यम झाले आहे. पुण्यातही अनेक तरुण मोठ्या प्रमाणात मीम्समधून आपली क्रिएटिव्हिटी दाखवत आहेत. ‘आपले पन्स’, ‘महाराष्ट्रीयन्स मीम्स’, ‘सेमी इंग्लिश मीडियम’ अशा फेसबुकवर धुमाकूळ घालणाऱ्या पेजेसवर दररोज मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मीम्स पाहवयास  मिळत आहे.

‘मीम’ म्हणजे नक्की काय?
कुठलेही एक छायाचित्र, ज्यातून एखादी माहिती किंवा विषय मांडला जातो. केवळ मनोरंजन याच हेतूने ते बनवले जाते. ट्रम्पपासून मोदींपर्यंत, मांजरीपासून कुंग फू पांडापर्यंत प्रत्येक व्यक्ती, प्राणी, वस्तू, स्थळ आदी गोष्टींवर मीम्स बनवले जातात. ‘मीम्स’ हे समाज माध्यमातून व्यक्त होण्याचे एक नवीन साधन झाले आहे. तरुणाईमधली ‘कूल’पणाची भावना या ‘मीम्स’मुळेच बदलली आहे, असे संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी सुहृद केळजी म्हणतो.

मीम्समुळे लोक त्या विषयाचा खोलात जाऊन अधिक विचार करतात. सध्या जागतिक हवामान बदलाविषयी ‘ग्रेटा थनबर्ग’ने छेडलेले आंदोलन हे त्याचेच एक उदाहरण. 
- हृषीकेश कुलकर्णी, इव्हेंट मॅनेजर

‘मीम्स’ला कुठलाही असा निश्‍चित प्रेक्षकवर्ग नसतो. सर्वच वयोगटांतील लोकांसाठी ‘मीम्स’ असतात आणि हेच त्याचे वेगळेपण आहे. 
- करण कदम, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com