ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याचे सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. यासंबंधी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून अहवाल सादर करावे आणि संबंधितावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
पुणे : महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे नगर दौऱ्यावर असताना ते जात असलेल्या वांबोरी-नगर रस्त्याच्या कामाची त्यांनी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांना खड्डे बुजविण्याचा कामात डांबर, खडी कमी प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले. काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे पाहताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले, निधी आणताना आमच्या नाकीनऊ येतात आणि तुम्ही जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी का करता. जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाला पाहिजे. हे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे, त्यावर त्वरित कारवाई करावी. अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करावी व तो अहवाल सादर करावा. सरकार असे काम अजिबात खपवून घेणार नसल्याची तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याचे सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. यासंबंधी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून अहवाल सादर करावे आणि संबंधितावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी
दरम्यान अशा प्रकारचे सूचना करून ते नगरकडे बैठकीसाठी रवाना झाले. आज सार्वजनिक विभागाच्या आधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि तेथील स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत खुलासा मागविला आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)