जागेच्या मोबदल्यात जागामालकाला अत्यल्प रक्कम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे -  "बीडीपी' आरक्षणाच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर द्यावा, असा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु जागामालकाला प्रत्यक्षात अत्यल्प मोबदला मिळाल्याचे समोर आले आहे. त्यांचे कोथरूड येथील बीडीपी आरक्षणाच्या जागेचे चौरस मीटरमधील उदाहरण. 

पुणे -  "बीडीपी' आरक्षणाच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर द्यावा, असा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु जागामालकाला प्रत्यक्षात अत्यल्प मोबदला मिळाल्याचे समोर आले आहे. त्यांचे कोथरूड येथील बीडीपी आरक्षणाच्या जागेचे चौरस मीटरमधील उदाहरण. 

कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक 71 व इतर जे बीडीपी आरक्षणामध्ये आहेत. या सर्व्हे क्रमांकामध्ये संजय (नाव बदलले आहे) यांच्या मालकीचे 2 हजार चौरस मीटर (म्हणजे 21 हजार 528 चौरस फूट) मालकीचे क्षेत्र आहे. त्यांनी हे क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात दिले, तर त्याच्या मोबदल्यात त्यांना आठ टक्के प्रमाणे 160 चौरस मीटर (1 हजार 722.24 चौरस फूट) एवढा टीडीआर मिळणार आहे. त्यांना टीडीआर देताना रेडी रेकनरमध्ये त्या जमिनीचा किती दर आहे, हे महापालिकेकडून लक्षात घेतले जाणार आहे. 

रेडी रेकनरमध्ये संजय यांच्या मालकीच्या सर्व्हे नंबर 71 व इतर या जमिनीचा दर 2 हजार 890 रुपये प्रतिचौरस मीटर एवढा आहे. त्यांना मिळणारा 160 चौरस मीटर टीडीआर गुणिले रेडी रेकनरमधील 2 हजार 890 रुपये दरानुसार त्यांना 4 लाख 62 हजार 400 रुपये एवढ्या किमतीचा टीडीआर मिळणार आहे. 2 हजार चौरस मीटर (21 हजार 528 चौरस फूट) एवढी जागा जमीनमालकाने महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर 4 लाख 62 हजार 400 रुपयांनी त्याला भागले, तर संजय या जमीनमालकाला केवळ 21 रुपये 47 पैसे चौरस फूट या दराने मोबदला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून जमिनी देऊन त्या मोबदल्यात टीडीआर घेण्यासाठी जागामालकाला प्रत्यक्षात येणारा खर्च पाहिला, त्यापेक्षाही कमी दराने त्यांना मोबदला मिळणार असल्याचे समोर आले आहे. 

बीडीपी आरक्षणाची ठिकाणे 
कोथरूड, वारजे, बावधन, हिंगणे खुर्द, आंबेगाव, धायरी, महंमदवाडी, कोंढवा, बाणेर, कात्रज, धानोरी, कळस, उंड्री, पिसोळी 
एकूण बीडीपी क्षेत्र 976 हेक्‍टर 

बीडीपी म्हणजे काय? 
पुण्याचे फुफ्सुसे असलेली टेकड्यांचे रक्षण व्हावे, पर्यावरणाचे संतुलन राहावे, यासाठी आरक्षित केलेली जागा. 

टीडीआर म्हणजे काय? 
हस्तांतरणीय विकास हक्क : म्हणजे आरक्षित जागेचा कागदावर मिळणार मोबदला. शहरात कुठेही वापरता येणारी जागा. 
- बीडीपीच्या जागेवर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करता येणार नाही. 
- फक्त महापालिकेला ऐतिहासिक स्थळसंवर्धनासाठी वापरता येईल. 
- जागेची खरेदी- विक्री करता येणार, अथवा जागा महापालिकेच्या ताब्यात देऊन टीडीआर घेता येणार. 
- अन्य आरक्षण विकसित करता येतात, परंतु हे विकसित न करता येणारे आरक्षण. 

Web Title: Minor amount to the owner for exchange of the space