पुण्य़ात अल्पवयीन गुन्हेगाराचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मांजरी : येथील एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी(ता.28) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
तुषार मोहन भापकर (वय १७, रा. वेताळनगर, मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मांजरी गावातील मांजराई देवी मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत आज्ञात आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर व शरीरावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केला आहे. तुषार हा गेली दोन वर्षे गुन्हेगारी क्षेत्रात मांजरी, महादेवनगर, हडपसर परिसरात आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्यावरती जबरी चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून अज्ञात मारेकरी पळून गेलेले आहेत. त्यांचा शोध हडपसर पोलिस घेत आहेत.
 
Web Title: Minor Criminal murder in pune