पुणे : अडीच वर्षांच्या चिमुरडीचा खुन करणाऱयाला अटक

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

वडिल आणि मामा सोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी म्हणून आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन तिचा खून करणार्या विक्रुताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. या घटनेत आरोपींने तिला अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. मात्र तिच्यावर बलात्कार झाला नसल्यानचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.
 

पुणे : वडिल आणि मामा सोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी म्हणून आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन तिचा खून करणार्या विक्रुताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. या घटनेत आरोपींने तिला अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. मात्र तिच्यावर बलात्कार झाला नसल्यानचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे.

प्रथमेश बाबू गायकवाड (वय 19, रा. पुणे स्टेशन) याला अटक केली आहे. पूनम राणा असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. पूनम ही मंगळवारी रात्री तिच्या आई सोबत रेल्वे रुग्णालयाच्या बाहेर पादचारी मार्गावर झोपली होती. त्यावेळी प्रथमेशने तिला पहाटे अडीचला उचलून नेले. आयपीए स्टेशन समोरून तो डेमू लागलेल्या यार्डात तिला घेऊन गेला. तेथे तिच्या गालावर चावे घेतले, त्यात तिला मोठ्या जखमा झाल्या, तसेच तिचे डोके आदळल्याने गंभीर जखमी झाली. डेमू रेल्वे स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी डब्यात गेले असता ही लहान मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी त्वरीत लोहमार्ग पोलिसांना याची देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डाॅक्टरांनी तिला मृत जाहीर केले. 

याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यामध्ये संशयित प्रथमेश दिसला. त्याला ताडीवाला रास्ता येथून बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेण्यास घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत  त्याने तिला मारल्याची कबुली दिली. दहीहंडीच्या दिवशी या मुलीच्या वडिलांनी व मामाने प्रथमेशला मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने या चिमुरडीया खून केल्याचा धक्कादायक खुलासा केला. यामध्ये तिचा बलात्कार झालेला नाही, असे परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले

दंततज्ज्ञांची घेतली मदत
या मुलीच्या चेहर्यावर व शरिरावर चावा घेतल्याच्या  अनेक जखमा आहेत. त्याची तपासणी करण्यासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयातील दंतशास्त्र तज्ज्ञ डाॅ. हरीश पाठक, डॉ. हेमलता पांडे यांना बोलविण्यात आले. त्यावरून ते दाताचे व्रण कोणाचे आहेत, हे तपासले. त्याचा पुरावा म्हणून ही वापर केला जाऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor girl murderer arrested in pune