धायरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल (ता.6)  दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

संबंधित तरुणी पुण्यातील धायरी भागात राहत होती. घरात घुसून तरूणीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. याबाबत तरुणीच्या वडिलांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आज (शुक्रवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा अज्ञात व्यक्तीकडून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून, त्याचा तपास सुरु आहे. यापुढील तपास सिंहगड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव (गुन्हे) करीत आहेत.

Web Title: Minor girl raped and murdered in Dhayari