काकानेच केली अल्पवयीन पुतणीचा बलात्कार करून हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे : धायरीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून मुलीच्या मावशीचा नवरा (काका)आहे. पिडीत मुलीच्या काकानेच तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केला आहे. उशीने तोंड दाबून आणि ओढणीने गळा आवळुन तिची हत्या करण्यात आली आहे. वैष्णवी भोसले (वय 17, रा. धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.  

पुणे : धायरीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून मुलीच्या मावशीचा नवरा (काका)आहे. पिडीत मुलीच्या काकानेच तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केला आहे. उशीने तोंड दाबून आणि ओढणीने गळा आवळुन तिची हत्या करण्यात आली आहे. वैष्णवी भोसले (वय 17, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.  

​आज झालेल्या पत्रकार परिषदमध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरेश्वर मंदिरामागे निलंकट हाईट्स येथे एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे  समजले. सदर गुन्ह्याची तपास करताना चौकशी दरम्यान मुलीच्या मावश्याच्या बोलण्यात विरोधाभास जाणवत होता. तसेच सीसीटिव्ही फुटेजमध्ये देखील तो दिसून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.यावरुन त्याला अटक केली आहे.  

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील गारमाळ भागात गुरुवारी (ता.6) सायंकाळी एका 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती सिंहगड पोलिसांना मिळाली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. त्या अहवालामध्ये लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तरुणीचे आई व वडील मजुरीचे काम करतात. ते दोघेही गुरुवारी कामावर गेले तेव्हा वैष्णवी घरी होती. संध्याकाळी आई-वडील घरी आल्यानंतर वैष्णवी घरात बेशुद्धावस्थेत आढळली. तिला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला

Web Title: Minor Girl Raped And Murdered by her uncle