खडकवासल्याची दिशा चुकली

falak.jpg
falak.jpg

खडकवासला : वडगाव खुर्द येथील हभप आमदार रमेश वांजळे उड्डाणपूलाजवळ सेवा रस्त्यावर महापालिकेने दिशादर्शक बसविला आहे. त्यावरील, खडकवासल्याची दिशा चुकली आहे. त्यामुळे वाहन चालकामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. 
 
'सकाळ'च्या वाचकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती सांगितली. शहरातून खडकवासला गावाकडे जाताना वांजळे उड्डाणपूलावरून रस्ता आहे. परंतु पुलाच्या सेवा रस्त्यावर वडगाव खुर्द (धायरी फाटा) येथील श्रीविठ्ठल रुख्मिणी मंदिराजवळ पालिकेने फलक बसविला आहे. त्याफलकावर खडकवासला, धायरी व नऱ्हे गावाची दिशा डाव्या बाजूला दाखविली आहे. 
त्या दिशेने गेल्यास लोक धायरी किंवा नऱ्हे गावात पोचतील. वा

हन चालकांची वाट चुकत आहे. या फलकातील फक्त खडकवासला गावाची दिशा चुकली आहे. गावाची दिशा चुकीची झाली आहे. ती सरळ करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com