‘कल्याणी राफेल’ क्षेपणास्रांचे पार्ट बनविणार

हैदराबाद - ‘कल्याणी राफेल’ला क्षेपणास्त्रांचे पार्ट बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे. या वेळी पिनी यंगमन व बाबा कल्याणी.
हैदराबाद - ‘कल्याणी राफेल’ला क्षेपणास्त्रांचे पार्ट बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे. या वेळी पिनी यंगमन व बाबा कल्याणी.

पुणे - ‘कल्याणी राफेल ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड इंडिया’ आता क्षेपणास्रांसाठी पार्ट बनविणार आहे. या कंपनीला राफेलकडून सहाशे ऐंशी कोटींचे (दहा कोटी डॉलर) कंत्राट मिळाले असून, ही कंपनी १००० बराक-८ एमआरएसएएम क्षेपणास्रासाठी यांत्रिक सामग्री उत्पादन करणार आहे.

हैदराबाद येथे आज राफेलचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि हवाई व क्षेपणास्त्र संरक्षक यंत्रणा विभागाचे व्यवस्थापक, ब्रिगेडिअर जनरल (निवृत्त) पिनी यंगमन यांनी कल्याणी राफेल ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड इंडियाला हे कंत्राट दिले. केआरएएस ही राफेल ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि कल्याणी स्ट्रेटेजिक सिस्टीम्स लिमिटेड यांच्यातील संयुक्त भागीदार कंपनी असून, त्यातील भारतीय भागीदाराचा वाटा ५१ टक्के आहे.

‘इन इंडिया’शी असलेली बांधिलकी जपत या कंपनीने भारतीय संरक्षण दलास सर्वोत्तम उत्पादन सुविधा, अत्याधुनिक अभियांत्रिकी सेवा पुरविण्यासाठी गुंतवणूक केली आहे. गेल्या दोन दशकांत राफेलने भारतात ‘इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून २५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

पिनी यंगमन म्हणाले, ‘‘मेक इन इंडिया’ उपक्रमात आम्ही बजावत असलेल्या भूमिकेचा आणि भारताच्या संरक्षण उद्योगातील गुणवत्तेशी असलेल्या नात्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या प्रकल्पाची सांगता होत असताना यापुढेही भारतातील इतर भागीदारांबरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com