लोणावळा : लायन्स पॉइंट येथून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह शोधण्यास येथील शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकास रविवारी (ता. 15) दुपारी यश आले. अॅलीझा राणा (वय 24, रा. हैदराबाद) असे मृत तरुणीचे नाव आहे.
गुरुवारी (ता. 12) राणा हिची बॅग लायन्स पॉइंट येथील कड्यावर आढळली होती. राणा हिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिस, स्थानिक नागरिकांनी वर्तवली होती.
शिवदुर्ग मित्रच्या पथकाने गुरुवार व शुक्रवारी शोधमोहीम राबविली. मात्र, ती आढळली नाही. रविवारी (ता. 15) शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकातील सदस्याने लायन्स पॉइंट येथील तीनशे फूट खोल दरीत उतरून शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळला. राणा ही पुण्यात नोकरीनिमित्त आली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.