या तरुणाला कुठे पाहिलेत का? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

पुणे : आळंदीला जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेलेला मांजरीतील विवाहित तरुण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी बेपत्ता त्याच्या पत्नीने मांजरी बुद्रुक पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. सिद्धेश्वर चिवाळा धस  (वय ३३, रा. चारवाडा ,मांजरी बुद्रुक, मूळ रा. डोहिफोडवाडी, जिल्हा -बीड) असे त्याचे नाव आहे.

पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सिद्धेश्वर हा पंचवीस दिवसांपूर्वी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आळंदीला जाऊन येतो, असा निरोप घरी देऊन निघून गेला होता. मात्र, अद्यापर्यंत तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सिद्धेश्वर याची पत्नी सीमा यांनी मांजरी बुद्रुक पोलीस चौकीत बेपत्ताची फिर्याद दिली आहे. अंगाने मध्यम, रंगाने गोरा, चेहरा उभट, अंगात पांढरा शर्ट आणि गुलाबी पॅन्ट परिधान केलेल्या या वर्णनातील तरुणाबद्दल कोणाला माहिती असल्यास त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing young from manjari