विद्यार्थ्यांनी भारतीय अस्मिता जपावी - डॉ. विश्वनाथ कराड 

MIT
MIT

लोणी काळभोर (पुणे) : भारतीय संस्कृती ही जगाला तत्वज्ञान आणि शांतीचा संदेश देणारी आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन एमआयटी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे केले.

एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचा 'दहावा दीक्षांत समारंभ' शुक्रवारी (ता. १६) पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विश्वनाथ कराड बोलत होते. यावेळी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त डॉ. सुनील कराड, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता प्रा. अनंत चक्रदेव, प्रा. धिमंत पांचाळ 
उपस्थित होते. यावेळी पदवीच्या १७० आणि पदव्युत्तर पदवीच्या ११५ अशा एकूण २८५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 

यावेळी विश्वनाथ कराड म्हणाले, "भारतीय समाज आणि संस्कृतीवर लादल्या व रुजल्या गेलेल्या परकीय धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय गुलामगिरीच्या जोडखडातून मुक्त करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी आवाज उठवला. त्यांच्या कालखंडात भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पार धुळीला मिळाले होते. हे स्वत्त्व आणि ही अस्मिता आधुनिक भारताच्या इतिहासात पहिल्यांदा चैतन्यमय करण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. जगासमोर भारतीय संस्कृतीची सर्वात्कृष्ट प्रतिमा मांडण्याचे काम ही स्वामी विवेकानंद यांनी केले. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. युवा पिढीने त्यांच्या विचाराच्या माध्य़मातून जगासमोर भारतीय अस्मिता मांडण्याचे आणि भारतीय संस्कृतीचे सुसंस्कृत दर्शन घडविण्याचे काम करावे."

भारतीय अस्मिताचे दर्शन जगाला घडावे, यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या परिसरात जगातील सर्वात मोठा घुमट बाधण्याचे काम सुरु आहे. लवकरच या घुमटचे उद्घाटन जगातील सर्व धर्माच्या धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात येईल. या घुमटच्या माध्यमातून जगभरातील संत, तत्वज्ञ यांचे पुतळे उभारण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती आणि अस्मिता याची जापली जावी हा उद्देश यामागे आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थितांचे आभार प्रा. दिमंत पांचाळ यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com