विद्यार्थ्यांनी  विकसित केली 'ई-स्कूटर' 

विद्यार्थ्यांनी  विकसित केली 'ई-स्कूटर' 

तमिळनाडूमध्ये "एसएई इंडिया'ने घेतलेल्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांच्या स्पर्धेत "एमआयटी'च्या "टीम बोल्ट'ने देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्रा. पुष्कराज सोनवणे, प्रा. समिधा जवादे, प्रा. आशिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचा कर्णधार गणेश पाटील व उपकर्णधार मोहम्मद तुर्की यांच्या नेतृत्वाखाली 15 विद्यार्थांच्या चमूने ऑटो ऑन-ऑफ इंडिकेटर, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ऑटोनॉमस ब्रेकिंग, हाय टॉर्क यासोबतच क्रूझ कंट्रोल, लेन डिपारचर असिस्ट यासारख्या नावीन्यपूर्ण, वापरावयास सोप्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या वैशिष्ट्यांनी युक्त ही स्कूटर माफक खर्चात बनवली आहे. 

पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्‍ट्रिक वाहने भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. वाहन उद्योग क्षेत्रात इलेक्‍ट्रिक वाहने नवी क्रांती घडवत असताना, संघाच्या प्रयत्नांना आलेल्या यशाबद्दल "एमआयटी'चे विश्‍वस्त प्रकाश बी. जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com