एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणे - डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निर्माण होतील. ते विश्‍वशांती स्थापन करण्यास महत्वपूर्ण भूमिका निभावतील. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे - डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निर्माण होतील. ते विश्‍वशांती स्थापन करण्यास महत्वपूर्ण भूमिका निभावतील. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले,‘‘विश्‍वामध्ये ब्रिटिश मॉडेल, युरोपियन मॉडेल आहे, त्याच प्रमाणे आता एक उत्तम भारतीय मॉडेल ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ च्या माध्यामातून जगासमोर मांडण्यात येत आहे. भारताच्या शिक्षण क्षेत्रात नवीन दालन उघडले आहे. शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे आणि विश्‍वशांतीसाठी महत्वपूर्ण कार्य येथून केले जाणार आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यावर बारकाईने लक्ष दिले जाईल.’’

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले की, ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ चा दर्जा मिळाल्यानंतर जे स्वातंत्र मिळाले त्याचा उपयोग करून शिक्षण क्षेत्रात आम्ही आमूलाग्र परिवर्तन करू. 

येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) अभियांत्रिकी शाखेतील मेकॅनिकल, इलेक्‍ट्‍र्रकल आणि सिव्हिल इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, एका वर्षासाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. व्यवस्थापन शाखेतील बीबीए, बीबीए(आयबी)साठी मार्केटिंग, फॉयनान्स, एचआर हे अभ्यासक्रम असतील. डयूएल स्पेशलायझेशनमध्ये स्पोर्टस, सीएसआर, ट्रॅव्हल ॲण्ड टूरिझम, इव्हेन्ट मॅनेजमेंट, आंत्रप्रेन्युरशिप असेल. एमबीएसाठी सीएसआर, स्पोर्टस मॅनेजमेंट, बी.एससी. व एम.एससी. इकॉनॉमिक्‍स, राजकीय नेतृत्व घडविणारा भारतातील पहिला आगळा-वेगळा अभ्यासक्रम- मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंट (एमपीजी) याचा देखील समावेश आहे. त्याच बरोबर अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि सोशल सायन्सेसमध्ये पीएचडी सुद्धा करता येईल. उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याच्या दृष्टीने संशोधक वृत्तीचा विकास करणे, रोजगार देणारे उद्योजक निर्माण करणे, नाविन्यपूर्ण व कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणे इत्यादी  डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची वैशिष्टये असतील. नालंदा विश्‍व विद्यापीठाचे कुलपती व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ.विजय भटकर म्हणाले, ‘‘विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयावर आधारित असे ज्ञान येथे मिळेल. ही युनिव्हर्सिटी जगात आपले वेगळेपण निर्माण करील. 

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, ‘‘पुर्वेकडील एमआयटीने पश्‍चिमेकडील एमआयटीपेक्षा शिक्षण क्षेत्रात नवीन पाउल उचलले आहे. जगातील मानवाला शांती मिळण्यासाठी येथून कार्य केले जाईल.’’ 

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, ‘‘येथे उच्च दर्जाचा मनुष्य घडविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाईल. वंचितांना शिक्षण देण्यासाठी डॉ.विश्‍वनाथ कराड यांची सुरूवाती पासूनची भूमिका होती. ती आज युनिव्हर्सिटीच्या माध्यातूनही ते पूर्ण करतील.’’

Web Title: mit world peace university