अपघातातून बचावले आमदार बाळा भेगडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

तळेगाव दाभाडे -  येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. मानेवर उपचार करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. 

तळेगाव दाभाडे -  येथील अथर्व हॉस्पिटलच्या लिफ्टचा रोप तूटून झालेल्या अपघातात आमदार बाळा भेगडे आपल्या मुलासह सुखरूप बचावले. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. मानेवर उपचार करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. 

या अपघाताबाबत माहिती देताना भेगडे म्हणाले, ‘‘शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास मान दुखत असल्याने उपचारासाठी तळेगाव स्टेशन येथील अथर्व हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्या वेळी माझ्या समवेत माझा मुलगा आणि हॉस्पिटलमधील एक कर्मचारी होता. लिफ्टमधून सहाव्या मजल्यावर जात असताना अचानक वीज गेली. विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर काही समजण्याच्या आत लिफ्ट वेगात खाली जावून खाली जोरात आदळली. आमच्यासमवेत हॉस्पिटलचा कर्मचारीही होता. मुलासमवेत आम्ही तिघे खाली सुखरूप पोचल्याची खात्री पटताच जीवात जीव आला. याबाबत अथर्व हॉस्पिटलचे डॉ. अजित माने म्हणाले, ‘‘आमदार बाळा भेगडे मान दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये आले होते. हॉस्पिटलमध्ये दोन लिफ्ट आहेत. त्यातील मोठ्या लिफ्टचा वापर स्टेचरवरून येणाऱ्या रुग्णांसाठी तर दुसऱ्या लिफ्टचा वापर अन्य नागरिकांसाठी केला जातो. हॉस्पिटल सुरू होऊन सुमारे एक वर्ष होऊन गेले. तेव्हापासून दोन्ही लिफ्टचा वापर सुरू आहे. शनिवारी दुपारी वीज गेली आणि वीजपुरवठा खंडित झाला. वीज गेल्यानंतर लागेच जनरेटर सुरू होण्याची व्यवस्था आहे. वीज गेल्यानंतर जनरेटर सुरूही झाले आणि त्याचा झटका लिप्टला बसला आणि रोप तुटला. याबाबत कंपनीकडे तक्रार केली असून, दुरुस्तीचे काम सुरू आहे.’’

Web Title: MLA Bala Bhegade escaped safely in the accident