शेरकर-अक्षय बोऱ्हाडे प्रकरण मिटविण्यात 'या' खासदार-आमदारांनी बजावली मोठी भूमिका 

दत्ता म्हसकर
रविवार, 31 मे 2020

सत्यशील शेरकर-बोऱ्हाडे प्रकरण मिटविण्यात खासदार अमोल कोेल्हे व आमदार अतुल बेनके या दोघांनी महत्वाची भूमिका बजावली.

जुन्नर : शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर  यांच्यातील वादावर आज रविवार (ता. ३१ रोजी) पडदा पडला आहे. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून हा वाद मिटविण्यात बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना यश आले आहे. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज वाजगे, युवा सेना प्रमुख गणेश कवडे यांचे देखील सहकार्य लाभले.

हेही वाचा- एकीकडं आयटीयन्सना नोकरीची भीती, त्या आता या आजाराने ग्रासलं!

आमचा संघर्ष उदयनराजेंशी नाही, तर ...

बोऱ्हाडे यांनी फेस बुक लाईव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभूमी विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व घरातले भांडण घरातच मिटले जावे या हेतूने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.

हेही वाचा- कामगारांसाठी ब्युरो स्थापन करणार, तर धमकविणाऱ्यांविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले...

यावेळी दोघांनी एकमेकांविषयी झालेले समज- गैरसमज दूर केले. आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. दोघांनीही आपआपले लोकसेवेचे काम एकमेकांच्या सहकार्याने एकत्रितपणे करण्याची भूमिका जाहीर केली.

जुन्नरमध्ये अतुल बेनके यांचा विजय

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या प्रकरणास वेगळे वळण लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे आमदार बेनके यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.
बोऱ्हाडे-शेरकर प्रकरणात आपल्या शिवजन्मभूमीची बदनामी होऊ नये हा वाद कुठेतरी थांबावा या उद्देशाने सर्वांनीच प्रयत्न केले . गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास कमीटी व ग्रामस्थांनी बैठक घेऊन सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे यांना समक्ष घेऊन चर्चेतून हा वाद सामोपचाराने मिटवला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सूरज वाजगे , गणेश कवडे, जालिंदर शिंदे, प्रदिप कंद, सनी निम्हण यांनी महत्वपूर्ण भूमीका पार पाडली. या प्रकरणी सोशल मीडियावर कोणीही उलटसुलट चर्चा करू नये असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Benke played a major role in clearing the Sherkar-Akshay Borhade case