सरसकट कर्जमाफीसाठी आमदार भरणे यांचे मुख्यमंत्र्याला साकडे

MLA Bharne requested the Chief Minister Fadanvis for a complete debt waiver
MLA Bharne requested the Chief Minister Fadanvis for a complete debt waiver

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यासह राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेवून सरसकट कर्जमाफी मागणी लावून धरली आहे. 

इंदापूर तालुक्यासह राज्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तसेच बॅंकाच्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी उसनवास पैसै घेवून विविध कार्यकारी सेवा संस्थेचे व बॅंकाचे थकीत कर्ज भरले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये आला असल्याने आज मंगळवार (ता. 28) ला आमदार भरणे यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. 

आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com