हे काय! आमदार झाले तरीही नगरसेवकपदीच

Vidhansabha
Vidhansabha

पुणे - विधानसभेचे सदस्य झालेल्या भाजपच्या आमदारांकडील महापालिकेतील जबाबदारी काढून घेण्यात आली तरी, त्यांचे नगरसेवकपद कायम ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हीच भूमिका घेतल्याने पुण्यातील नवे पाच आमदार नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करणार असल्याचे स्पष्ट आहे. निवडणुका टाळण्यासाठी हे आमदार राजीनामा देणार नाहीत, असे दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीत तत्कालीन महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे सुनील कांबळे आणि ‘पीएमपी’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. टिळक यांची मुदत संपल्याने त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. मात्र कांबळे यांच्याकडे स्थायी; तर शिराळे यांच्याकडे ‘पीएमपी’ संचालकपद कायम होते. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी या दोघांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आमदारांना त्यांची कामे करता यावीत, यासाठी महापालिकेतील जबाबदारीतून मोकळे केल्याचा दावा भाजपने केला. मात्र, राजीनाम्यामुळे निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने त्‍यांच्याकडे नगरसेवकपद राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com